Friday, 20 March 2015

उम्मेद

कशाला कुणी उदास व्हावे,
का ह्या मनाने सतत रडावे,

होत नाही नेहमीच पूर्ण सर्व अपेक्षा,
राहतात अधुऱ्या काही इच्छा,

चालताना जीवनाच्या मार्गावरून,
नको थांबवू प्रवास हार स्वीकारून ,

निराशा आणि दुख हे नाही देत आधार,
मेहनत, विश्वास आणि धैर्य, हेच खरे साथीदार,

काळ्या ढगातून जशी उम्मेदीची वीज चमकते,
तसेच अपयशातही "यश" हे लपलेले असते,

विचारचक्र

पुस्तक,वही,पेन या सगळ्यांचा मला कंटाळ आला,
काही तरी वेगळे करावे, असा मनात विचार आला,

निसर्गात रोज नवी फुले आणि पाने उमलतात,
त्यांचे ताजेपण पाहून माझ्या मनात विचार घोळतात,

मी सुद्धा काही करावे ज्याने जगाची सुंदरता वाढावी,
जगात कल्याणाच्या दिशेने मी पण पावले पुढे टाकावी,

आकाशात रात्री चंद्र आणि तारे चमकतात,
जीवनाला ते नव सौंदर्य बहाल करतात,

बघून त्यांना मनात माझ्या विचार आला,
मीही छोटेसे योगदान द्यावे,
ज्याने जग हे स्वछंदपणे जगण्याचे ठिकाण व्हावे,

हा विचार करता करता कुठून तरी आवाज आला,
पुढच्या टेस्टच्या अभ्यास करा, असा निरोप आला,

पुस्तक,वही,पेन घेऊन अभ्यासाला सुरुवात केली,
जग उद्धाराची कल्पना माझ्या मनातच राहिली.

माझे स्वप्न

 जीवन हे माझ्या मनाप्रमाणे  जगायचे मला,
आकाशात उंच झेप घेण्याऱ्या पक्ष्याप्रमाणे उडायचे मला,

    जशी लख्खन चमकते वीज ढगात,
तसेच मलाही चमकायचे आहे या जगात,

    यशाची पायरी चढणे, हेच स्वप्न बघते,
नुसते बघत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न हि करते,

    माझ्या आकांशा पूर्ण करण्याचा सुरु केला प्रवास,
नसतील त्यात काटे पण असेल गुलाबाचा सुवास,

    कसे दिसते हे जग वर उंचावरून ,
बघायचे मला स्वतः तिकडे पोहचून ,

    स्वच्छंद उडणाऱ्या पक्ष्याला नेहमी बघून,
विचार येतो कि स्वप्न सगळे पूर्ण दाखवायचे करून,

    आणि मग उंच झेप घ्यायची आकाशाला ,
कारण जीवन हे माझ्या मनाप्रमाणे जगायचे मला

I miss the old us...

I talked to a close school friend,
And I said, I miss the old us,
The innocence, the fight, the promise of being friends till the end.

I chatted with a dear college friend,
And I wrote, I miss the old us,
The fun , the laugh, the care, so easily did we blend.

I looked through photos of roomies,
And I thought, I miss the old us,
The late night talks, the early morning walks and the uncountable memories.

And I realized, missing old 'us' is a good sign,
It reminds me that I always had an awesome time,
Because FRIENDS were forever a part of that life.

Today, I should make some new friends,
Enjoy a little, laugh a lot and talk something senseless,
So that I say again in the future,
I miss the old you, the old me and the old us.

Thursday, 19 March 2015

Happy Hour

Some say enjoy your life in early years,
Coz you won’t be able to enjoy later.
Others say work hard in initial years,
So that you can enjoy your life later.

The best time to enjoy is neither early nor later,
The right moment to enjoy life is either now or never.
Because fun time never strikes on the clock tower,
It is you who decide your own happy hour.

Postpone the happy hour to tomorrow,
And you will live a life of sorrow.
Enjoy every moment without any worries,
And you will have happy days, weeks, months and years.