Friday, 20 March 2015

माझे स्वप्न

 जीवन हे माझ्या मनाप्रमाणे  जगायचे मला,
आकाशात उंच झेप घेण्याऱ्या पक्ष्याप्रमाणे उडायचे मला,

    जशी लख्खन चमकते वीज ढगात,
तसेच मलाही चमकायचे आहे या जगात,

    यशाची पायरी चढणे, हेच स्वप्न बघते,
नुसते बघत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न हि करते,

    माझ्या आकांशा पूर्ण करण्याचा सुरु केला प्रवास,
नसतील त्यात काटे पण असेल गुलाबाचा सुवास,

    कसे दिसते हे जग वर उंचावरून ,
बघायचे मला स्वतः तिकडे पोहचून ,

    स्वच्छंद उडणाऱ्या पक्ष्याला नेहमी बघून,
विचार येतो कि स्वप्न सगळे पूर्ण दाखवायचे करून,

    आणि मग उंच झेप घ्यायची आकाशाला ,
कारण जीवन हे माझ्या मनाप्रमाणे जगायचे मला

No comments:

Post a Comment